मठ ठाकूरवाडी मुख्य रस्तानजीकचे दगड त्वरित हटविले..
⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला उपसभापती सचिन देसाई यांनी वेंगुर्ला तालुक्यातील मुख्य रस्तानजिक असलेले धोकादायक दगड हटवीण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना दिले होते. याबाबत मठ ठाकूरवाडी येथील वळणावरील धोकादायक ठेवण्यात आलेले दगड संबंधिताकडून त्वरित हटविण्यात आले आहेत. तसेच मठ कुडाळतिठा येथे भरावाची मातीचा मोठा ढीग चक्क ‘गटारात’ ओतण्यात आला होता. संबंधित मातीही साईडपट्टी भरावासाठी वापरण्यात आली आहे. त्यामुळे उपसभापती सचिन देसाई तसेच सभापती शंकर घारे यांनी राबविलेल्या धडक कामगिरीचे वाहनधारकांतून मोठे कौतुक होत आहे.
