सावंतवाडी-बांदा महामार्गावर अर्धवट तुटलेले झाड धोकादायक…

प्रशासनाच दुर्लक्ष: गुरु गवंडे यांचा आरोप..

⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी बांदा महामार्गावर झाड अर्धवट तुटून पडलेले आहे परंतु राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी मात्र मूग गिळून गप्प आहेत आपत्कालीन व्यवस्थापना फक्त जिल्हाधिकारी प्रशिक्षण देऊन घोषणाबाजी करत आहेत वास्तवात परिस्थिती जैसे थे तशीच आहेआज हे झाड या ठिकाणी धोकादायक असून अपघात घडल्यास त्या जबाबदार कोण राहणार यापूर्वीही वादळी वाऱ्याने पडलेली झाडे याच महामार्गावर जिल्हा परिषद सदस्य इन्सुली नितीन राऊळ यांनी आपल्या सहकारी यांना घेऊन दूर केली होते परंतु आज या माजगाव रस्त्यावर पडलेले अर्धवट तुटून झाडावर लक्ष द्यायला महामार्गाच्या अधिकाऱ्यांना वेळ नाही वारंवार त्यांना सूचना देऊनही ते डोळे झाक केल्यासारखे करतात या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी या विषयी महामार्ग अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे बैठक घेण्याचे ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले परंतु जिल्हाधिकारी यांनी या विषय गांभीर्याने घेतलेला नाही. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी अपघात घडल्यास जिल्ह्याची आपत्कालीन व्यवस्थापनात जबाबदार राहणार आहे आपत्कालीन व्यवस्थापना काय आहे हे आता जनतेला कळून चुकलेला आहे त्यामुळे पेपरबाजी आणि घोषणाबाजी करण्यापेक्षा वास्तविक परिस्थिती आहे ती अगोदर सुधारा असा इशाराही सामाजिक कार्यकर्ते गुरुदास गवंडे यांनी दिलेला आहे

You cannot copy content of this page