⚡सावंतवाडी ता.२९-: श्री काळोबा मित्रमंडळ धाकोरे वसवाचे तळे यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन आजगाव वसवाचे तळे शाळेत करण्यात आले होते.या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत अर्जुन पालव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच शारदा देवीच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली .यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रविण पालव यांनी उपस्थितांना स्पर्धेविषयी माहिती देत श्री काळोबा मित्रमंडळाच्या उपक्रमांची माहिती देत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर अर्जुन पालव, सुभाष गावडे, बाबली कापडी, विष्णू परब ,त्रिशा गावडे ,प्रवीण पालव अनिकेत कापडी, रामदास गावडे ,तात्या गावडे, मुख्याध्यापक अर्जुन रणशूर, शिक्षिका प्रेरणा गोवेकर, पूजा कोठावळे , सौ.मुळीक उपस्थित होते.
तर कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक अर्जुन रणशूर यांनी केली.
श्री काळोबा मित्रमंडळ हे नेहमीच सामाजिक, शैक्षणिक कार्यात कार्यरत असून,मंडळाच्या माध्यमाने विविध प्रकारचे उपक्रम राबवित असतात. याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे तसेच दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन केले होते.या त्यांच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
स्पर्धेतील विजेते (पहिला गट)-
संध्या दत्ताराम पालव,(प्रथम),दिव्या उमेश मुळीक,(द्वितीय) ,ईश्वरी नामदेव मुळीक(तृतीय) तर उत्तेजनार्थ अनुज एकनाथ मुळीक
(दुसरा गट) – लावण्या श्रीराम प्रभूराळकर (प्रथम) ,श्रावणी एकनाथ मुळीक ( द्वितीय) ,यश प्रसाद गावडे ( तृतीय) तर उत्तेजनार्थ परिधी रामचंद्र सावंत
तिसरा गट – राज रामदास गावडे (प्रथम), संजना सागर गावडे ( द्वितीय) , गौरांगी समीर रानगावकर (तृतीय), तर उत्तेजनार्थ आदित्य रवींद्र मुळीक.
तर चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम दैनिक सकाळ चे जाहिरात प्रमुख हेमंत खानोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी मदन मुरकर,दामिनी परब, स्वाती पालव ,राजश्री, गावडे प्रियंका, गावडे, सिया गावडे ,श्रीशा गावडे ,कृष्णा पुळास्कर, उदय गावडे, धाकोरे शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर तळणकर,सोनल जाधव, प्रेरणा गोवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, रोख रक्कम व मंडळाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
तर सेवानिवृत शिक्षिका प्रियांका आजगावकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
स्पर्धेसाठी सन्मानचिन्हे सुरेंद्र विजयराव भोसले ,नेताजी सुभाष बोस (INA ट्रस्ट) यांनी पुरस्कृत केली.तर मनिषा गोवेकर, दिलीप जाधव,एकनाथ मुळीक यांनी स्पर्धेसाठी बक्षिसांसाठी सहकार्य केले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रियांका आजगावकर ,रामदास गावडे यांनी काम पाहिले.
तर प्रस्तावना मुख्याध्यापक अर्जुन रणशूर तर आभार प्रेरणा गोवेकर यांनी मानले.
कार्यक्रमासाठी अल्पोपहाराची सोय प्रवीण पालव यांनी केली.यावेळी ग्रामस्थ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
