अध्यक्षपदी गोविंद शेर्लेकर, सचिवपदी उत्तम पाटील..
⚡बांदा ता.१३-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, सावंतवाडी शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन मंगिरीष हॉल, सावंतवाडी येथे उत्साहात पार पडले. या अधिवेशनास जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रमोद कामत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुस्मिता जाधव, राज्य महासचिव राजन कोरगावकर, नपा-मनपा प्रमुख सुधाकर सावंत, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक तसेच गटशिक्षणाधिकारी सविता परब यांची उपस्थिती होती. याशिवाय राज्य व जिल्हा कार्यकारिणी सदस्य, शिक्षक पतपेढी संचालक तसेच तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या अधिवेशनात सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी सावंतवाडी शाखेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी गोविंद शेर्लेकर, सचिवपदी उत्तम पाटील, शिक्षक नेते म्हणून समीर जाधव, कार्याध्यक्षपदी हेमंत सावंत आणि कोषाध्यक्षपदी सुहास गावडे यांची निवड करण्यात आली.तसेच उपाध्यक्षपदी केशव जाधव, उद्देश नाईक, शंकर पावसकर आणि आनंद कोळापटे यांची निवड करण्यात आली असून प्रवक्तापदी सत्यजित वेतूर्लेकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.
अधिवेशनात शिक्षक संघटनेच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. नवीन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
