कणकवलीत महाराणा प्रताप पुतळ्यास मराठा समाजातर्फे अभिवादन…

⚡कणकवली ता.१३-:
शहरातील नागवे रोडवरील रवळनाथ मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास
सोमवारी सकल मराठा समाज प्रतिष्ठानचे पदाधिकारी व मराठा समाजबांधवानी भेट देत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मराठा समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई परब, सचिव महेंद्र सांब्रेकर, पं.स. सदस्य बबलू सावंत, शेखर राणे, बच्चू प्रभूगावकर, सुशील सावंत,तेजस राणे,गजू राणे, अन्या बाईत आदी उपस्थित होते.
रस्त्यालगतच ग्रामस्थांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या पुतळ्यामुळे परिसरात ऐतिहासिक वातावरण निर्माण झाले असून, या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.सोमवारी सकाळी मराठा समाजातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी पुतळा स्थळी एकत्र जमले. यावेळी महाराणा प्रताप यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला तसेच त्यांच्या शौर्य स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
पुतळ्याच्या ठिकाणी वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक असा फलक लावण्यात आला आहे. यामुळे या परिसराला एक नवी ओळख मिळाली आहे. तसेचश्री. देव रवळनाथ मंदिर परिसर हा ग्रामदैवताचे स्थान असल्याने येथे उभारण्यात आलेला हा पुतळा ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान,ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने उभारलेला हा पुतळा कणकवलीच्या वैभवात भर घालणारा ठरत असून इतिहासाची जपणूक आणि प्रेरणा देणारा उपक्रम म्हणून चर्चिला जात आहे.

फोटो
रवळनाथ मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप पुतळ्यास अभिवादन करताना मराठा समाज प्रतिष्ठानचे पदाधिकारी व समाज बांधव. (छाया – अनिकेत उचले)

You cannot copy content of this page