भारत रत्न डाॅ ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्काराने योग शिक्षक शेखर बांदेकर सन्मानित..

⚡बांदा ता.१२-: फिटनेस योग अकॅडमी सिंधुदुर्गचे योग शिक्षक शेखर बांदेकर यांना त्यांच्या कार्याची दखल घेत ए डी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन योग शिबिर घेणे, योग वर्ग घेणे योगाभ्यासबाबत जनजागृती करणे तसेच नियमित, निस्वार्थी आणि निःशुल्क सहा वर्षे योगसेवा देणे या त्यांच्या कार्याची दखल घेत योग क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा ठसा आज समाजामध्ये उमटलेला आहे, ही अभिमानाची व कौतुकास्पद बाब आहे अशी योग सेवा ऑनलाइन आणि ऑफलाइन स्वरूपात देत असताना त्यांच्याकडे योगक्षेत्रातील उत्तम योगशिक्षक म्हणून पाहिले जात आहे म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
सावित्रीबाई फुले सभागृह पुणे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुंबईचे आयकर आयुक्त सचिन मोटे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला. या कार्यक्रमास सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे सौ रुक्मिणी गलांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे श्रीराम मांडुरके, वरीष्ठ पोलीस निरीक्षक पुणे विजय गोरड, मुंबई उच्च न्यायालयाचे ऍड. अशोक शिंदे, अध्यक्ष अशोक गोरड आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून 20 योगसाधक उपस्थित होते.
हा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे योगशिक्षक श्री बांदेकर यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे.
फोटो:-
पुणे येथे पुरस्कार स्वीकारताना योग शिक्षक शेखर बांदेकर.

You cannot copy content of this page