⚡आंबोली,ता.१२-: आंबोली घाटात ७ व्या किलोमीटर वर आयशर टेम्पो आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. यात दुचाकी वरील निकिता प्रसाद राऊत (वय११) हि जागीच ठार झाली तर अन्य दोघे जखमी झाले.
आंबोली घाटात ११ च्या दरम्यान ७ व्या किलोमीटर वर वळणावर फरशी भरलेल्या वेगाने जाणाऱ्या आयषर टेम्पो ने ओव्हर टेक करताना ठोकरले. या दुचाकी वर आंबोली फौजदार वाडी मधील प्रसाद गोविंद राऊत,त्यांची पत्नी आणि एक ४ वर्षाची मुलगी आणि एक ११ वर्षाची मुलगी होती.त्यातील ११ वर्षाची मुलगी निकिता राऊत डोके आपटल्याने जागीच ठार झाली. तर तिची आई हि जखमी झाली प्रसाद राऊत हे पण जखमी झाले. घटना स्थळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आणि हवालदार संतोष गेलोले यांनी पंचनामा केला.जखमी ना तात्काळ आंबोली आरोग्य केंद्रात दाखल केले.डॉ. प्रमोद गहाणे यांनी निकिता हिला मृत घोषित केले. तर तिच्या आई स सिटी स्कॅन साठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.घटना स्थळी पळून जाण्याच्या स्थितीत आयषर चालकांना ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान या घटने नंतर आंबोली परिसरात शोक कळा पसरली.
