दत्ता सामंत:वराडकर हायस्कुलच्या शतकमहोत्सवाचा शुभारंभ..
मालवण दि प्रतिनिधी
स्व. डॉ. काकासाहेब वराडकर यांनी शंभर वर्षांपूर्वी दूरदृष्टी ठेवून वराडकर हायस्कुल रुपी लावलेले रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. विविध क्षेत्रातील माणसे या शिक्षणसंस्थेवर कार्यरत आहेत. त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे, शिक्षकांना गुरुस्थानी मानले पाहिजे. मुलांनी तन, मन, धन अर्पून उत्तम शिक्षण घेत प्रगती साधावी. शाळेच्या विविध शैक्षणिक गरजा आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत यांनी येथे बोलताना केले.
कट्टा येथे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय या शाळेच्या शताब्दी महोत्सवास आजपासून प्रारंभ झाला. या शताब्दी महोत्सवाचे उदघाटन उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले यावेळी व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर (निवृत्त), ऍड. एस. एस. पवार तसेच संस्थेचे अध्यक्ष अजयराज वराडकर, जि प उपाध्यक्ष तुकाराम साहिल, जि प बांधकाम व वित्त सभापती संतोष साटवीलकर उपनगराध्यक्ष दीपक पाटकर व्हिकटर डॉन्ट्स, जि प सदस्या सुमेधा पाताडे जि प सदस्या दिपलक्ष्मी पडते, संतोष गावडे, उपसरपंच आबा कामतेकर प्रभाकर वाईरकर, गणपत जाधव, संस्थेचे सचिव सुनील नाईक व श्रीमती विजयश्री देसाई स्कुल कमिटीचे चेअरमन सुधीर वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, रवींद्रनाथ पावसकर, साबाजी गावडे, महेश वाईरकर, श्रुती वराडकर, स्वाती वराडकर, आनंद टेमकर, मुख्याध्यापिका देवयानी गावडे, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, अविनाश जठार आदी व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सुनील नाईक यांनी प्रास्ताविक केले
यावेळी दत्ता सामंत म्हणाले, मुलांनी आपल्या जीवनात शिस्त पाळली पाहिजे. विद्यार्थ्यांनी या संस्थेवर, शिक्षकांवर प्रेम केले पाहिजे. शिक्षकांचा आदर करत त्यांचे ऐकले पाहिजे. आज स्पर्धा वाढली असून या स्पर्धेत आपली मुले टिकण्यासाठी शिक्षकांनी मुलांची आवड लक्षात घेऊन शिक्षण दिले पाहिजे. आज नोकऱ्या मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमधून उद्योजक घडले पाहिजेत.
