कुडाळ : जनआशीर्वाद यात्रे दरम्यान माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झेंडे दाखवणे व घोषणाबाजी केलेल्या प्रकरणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख राजन नाईक यांच्या सह 12 जणांची कुडाळ न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली.
याबाबत राजन नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांनी 2021 मध्ये केंद्रीय मंत्री झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनाशिर्वाद यात्रा काढली होती. ती यात्रा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुडाळ तालुका कार्यालय येथे पोचली असता नारायण राणे यांच्या समर्थकांकडून घोषणा देण्यात आली त्या विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुडाळ मधील कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांच्या विरोधात घोषणा दिल्या व झेंडे दाखवले होते. त्या प्रकरणी राजन नाईक यांच्या सह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याप्रकरणी शुक्रवारी कुडाळ न्यायालयाने त्यांची निर्देश मुक्तता केली. राजन नाईक यांच्या बाजून अँड.सुधीर राऊळ, ॲड. किर्ती कदम, अँड. प्रदनेश राऊळ यांनी युक्तिवाद केला.
यावेळी राजन नाईक यांनी सांगितले की, विजय हा नेहमी सत्याचा होत असतो. काही पोलिस अधिकारी यांनी चुकीच्या पद्धतीने आमच्यावर गुन्हे दाखल केले, पण न्यायदेवतेने आज आम्हाला निर्दोष मुक्त केले.
ठाकरे सेना तालुका प्रमुख राजन नाईक यांच्यासह १२ जणांची निर्दोष मुक्तता…
