“कोकण कला व शिक्षण विकास संस्थेकडून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी २५ हजारांची मदत”…

⚡सावंतवाडी ता.११-: आपल्या सामाजिक सेवेच्या कार्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व म्हणजे मा.दयानंद कुबल ( मुंबई) यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन “कोकण कला व शिक्षण विकास संस्था” या त्यांच्या संस्थेतर्फे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी 25 हजार रुपयांची देणगी दिली.
मा.दयानंद कुबल यांचे सामाजिक क्षेत्रामध्ये तसेच शैक्षणिक, आरोग्य,रोजगार या क्षेत्रांमध्ये खूप मोठे योगदान आहे. निराधारणा आधार देणे आश्रमांना मदत करणे असे अनेक उपक्रम ते सातत्याने राबवत असतात. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतली जाते. त्यांना अनेक सामाजिक पुरस्कार मिळाले आहेत ही गोष्ट आमच्या सारख्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी अभिमानाची आहे.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांना आभार पत्र देऊन त्यांचे आभार मानण्यात आले.
तसेच जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी उत्तम गणेश धुरी यांनी ही सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन संस्थेला दहा हजार रुपयांची देणगी दिली. या सर्व दात्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर तसेच उपाध्यक्ष प्रा.शैलेश नाईक यांनी त्यांचे आभार मानले.
याप्रसंगी संस्थेचे सदस्य रूपा मुद्राळे लक्ष्मण कदम व रवी जाधव उपस्थित होते.

You cannot copy content of this page