भोसले फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सुयश…

४७ विद्यार्थ्यांना अँटीला व युनिकेममध्ये प्लेसमेंट, उद्योगविश्वात कॉलेजची छाप….

⚡सावंतवाडी ता.११-: यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या ४७ विद्यार्थ्यांची गोवा येथील अँटीला हेल्थकेअर व युनिकेम लॅबोरेटरीज या नामांकित कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड झाली आहे. या यशामुळे कॉलेजच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल करिअर घडविण्याच्या ध्येयाला बळकटी मिळाली आहे._

कॉलेजमध्ये ६ एप्रिल रोजी अँटीला हेल्थकेअरचे इंटरव्हयू आयोजित करण्यात आले होते. यामध्ये बी.फार्म व डी.फार्म या दोन्ही विभागातील विद्यार्थी सहभागी झाले होते. यात २२ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. ८ एप्रिल रोजी युनिकेम लॅबोरेटरीजचे इंटरव्हयू संपन्न झाले. यामध्ये बी.फार्म अंतिम वर्षातील ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पैकी २५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. हे इंटरव्हयू क्वालिटी अ‍ॅश्युरन्स, क्वालिटी कंट्रोल व प्रॉडक्शन या विभागांसाठी घेण्यात आले. दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना मुलाखत प्रक्रिया व उद्योगक्षेत्रातील संधींबाबत माहिती दिली. प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत करिअर संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

_विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, सीईओ ले.कर्नल रत्नेश सिन्हा व प्राचार्य डॉ.विजय जगताप यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण प्रक्रियेचे यशस्वी नियोजन कॉलेजच्या टीपीओ हेड प्रा.नमिता

You cannot copy content of this page