नारायण राणे यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त प्रवीण भोंसले यांच्याकडून शुभेच्छा…

⚡कणकवली ता.१०-:
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले यांनी त्यांच्या कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी भेट घेऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण व सर्वभौम विकास पुढेही घडत राहो तसेच त्यांना उत्तम आरोग्य लाभो, अशा शुभेच्छाही भोंसले यांनी व्यक्त केल्या.
तसेच, या प्रसंगी सौ. नीलमताई राणे यांच्या उपस्थितीत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संपूर्ण जीवनावर आधारित अरुण तिवारी लिखित व सकाळ प्रकाशन प्रकाशित पुस्तक भेट देण्यात आले.

You cannot copy content of this page