सावंतवाडी ता.१० :
कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.
डॉ. शिंदे यांनी ओम गणेश निवासस्थानी भेट देत खासदार नारायण राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासोबत डॉ. शिंदे यांनी संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली.
संजू परब यांनी घेतली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची सदिच्छा भेट…
