आचरा रामेश्वर संस्थांनकडून प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन सुपुर्द…

*💫मालवण दि.२४-:* सध्या कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेत आचरा गाव व पसनचक्रोशीत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. अशातच सर्वत्र ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. हे ओळखून आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कडून आचरा आरोग्य केंद्राला सुमारे 70 हजार किमतीची ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून दिली. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचे अध्यक्ष मिलिंद मिराशी, खजिनदार श्री. सुधीर सुखटणकर यांच्या उपस्थितीत ऑक्सिजन कॉंसेंनतेटर मशीन आचरा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी शामराव जाधव त्यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.

You cannot copy content of this page