सहकार व पणन मंत्री बाळा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

लॉक डाऊन मुळे कोल्हापुरात अडकलेले विज वितरणचे साहित्य मालवणात दाखल*

मालवण दि प्रतिनिधी राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कोल्हापूर येथे लॉकडाऊन मुळे अडकलेले वीज वितरणच्या साहित्याचे ट्रक मालवणात आज दाखल झाल्याने नजीकच्या काळात गेले आठ दिवस काळोखात असणारा मालवणचा भाग लख्ख प्रकाशाने उजळून निघणार आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री. अमित सामंत यांनी मालवण येथे वीज वितरणचे कार्यकारी अभियंता श्री. मोहिते यांची भेट घेऊन नामदार बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याची माहिती देतानाच मालवणातील वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी समस्या असतील तर ताबडतोब सांगा त्या दूर करण्याचा प्रयत्न करू मात्र मालवण वासीय अंधारात राहता कामा नये असे त्यांनी स्पष्ट केले. तौक्ते चक्रीवादळामुळे गेले आठ दिवस मालवण तालुक्यातील काही भाग खंडित वीज पुरवठ्यामुळे अंधारात आहे. गेले आठ दिवस वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक असणारे वीज पुरवठाचे साहित्य कोल्हापूर येथून मालवणात आले नव्हते. त्यामुळे वीज वितरणने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी परजिल्ह्यातून कामगार आणले तरी आवश्यक असणारे साहित्य नसल्याने मालवणचा काही भाग हा विजे अभावी राहिला होता. दोन दिवसापूर्वी राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील हे मालवण दौऱ्यावर आले असताना वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वीज वितरणचे साहित्य मालवणात घेऊन येणाऱ्या गाड्या अडविल्याची माहिती दिली होती. यावेळी पाटील यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आपण चर्चा करू त्या मालवणात मार्गस्थ करण्यासाठी आदेश देऊ असे सांगितले होते. त्यानुसार वीज वितरणच्या साहित्याच्या गाड्या आज मालवणात दाखल झाल्या. या संदर्भात आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री. अमित सामंत यांनी मालवण वीज वितरण कार्यालयात खास येऊन वीज वितरणचे कार्यकारी अभियंता श्री. मोहिते यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी वीज पुरवठा सुरू होण्यात अन्य अडचण असेल तर सांगावी. राष्ट्रवादी प्रामाणिकपणे काम करून त्या अडचणी दूर करतील असे सांगितले. त्यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी मालवणचे तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, अगोस्तिन डोसीजा, सौ. सदफ खटखटे, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, नगरसेवक दीपक पाटकर ,प्रमोद कांडरकर आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page