*तीन खाजगी ट्रॅव्हलर्सवर देवगड पोलिसांची कारवाई

*ई-पास व आरपीटीसीआर टेस्ट अहवाल नसल्याप्रकरणी गुन्हा दाखल*

*💫देवगड दि.२३-:* ई-पास व आरपीटीसीआर टेस्ट अहवाल नसलेल्या तीन खाजगी टड्ढॅव्हलर्स व त्यांच्या चालक क्लिनर यांच्यावर देवगड पोलिसांनी कारवाई केली आहे.तीन खाजगी टड्ढॅव्हलर्सच्या एकूण ९ जणांविरूध्द पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.पोलिसांच्या या कारवाईने खाजगी टड्ढॅव्हलर्स व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.देवगडमधील या तीन खाजगी टड्ढॅव्हलर्सवर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, जिल्हा बाहेर जाण्याचा परवाना(ई-पास) व आरटीपीसीआर टेस्ट अहवाल नसताना दि. २३ मे रोजी देवगड ते मुंबई जाणाèया तीन खाजगी टड्ढॅव्हलर्सवर पोलिसांनी सायंकाळी ५ वा.शिरगाव चेकपोस्ट येथे ही कारवाई केली. शिरगाव चेकपोस्ट येथे २३ मे रोजी सायंकाळी ५ वा.सुमारास मुंबईकडे जाणाèया या तीन टड्ढॅव्हलर्सचे चालक व क्लिनर(मदतनीस) यांच्याकडे पोलिस कर्मचारी विशाल वैजल यांनी चौकशी केली असता त्यांच्याजवळ ई-पास व आरटीपीसीआर अहवाल मिळाला नाही. यामुळे कोरोना विषाणुचा संसर्ग पसरविण्याची शक्यता असताना सुध्दा, त्यांचा कृत्याने आजाराचे संक्रमण होवू शकते हे माहिती असुनदेखिल जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अवाज्ञा केल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी खाजगी टड्ढव्हलर्सचे चालक अनेश अनंत डोंगरकर(देवगड), महेश काशीराम तेरवणकर(जामसंडे), सुशांत प्रकाश मेस्त्री(वळीवंडे), मोतीचंद्र रामप्रसाद राजभर(विलेपार्ले), निलेश वसंत कदम(कुणकेश्वर), शशिकांत वसंत अनभवणे(शिरगाव) व क्लिनर चंद्रकांत मुरलीधर लोरेकर(कावलेवाडी), अनंत सुभाष राणे(qहदळे) व सावळाराम आत्माराम गावकर(कुणकेश्वर) या एकूण ९ जणांविरूध्द भादवि कलम १८८, २६९, २७०, २७१, आपत्ती व्यस्थापन अधिनियम २००५ कलम ५१ ब, साथीचे रोग अधिनियम १८९७ कलम ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.तपास स.पो.निरिक्षक संजय कातिवले करीत आहेत.

You cannot copy content of this page