तालूका प्रमुखांच्या मनमानीला कंटाळून वेत्ये शाखाप्रमुख, बुथ प्रमुखांचे राजीनामे

*💫सावंतवाडी दि.२४-:* शिवसेनेचे सावंतवाडी तालुका प्रमुख यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आज वेत्ये गावच्या शाखाप्रमुख आणि बुथ प्रमुख यांनी आज आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यावेळी त्यांनी आपल्याला तालुका प्रमुख कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नसून, विरोधी लोकांन सोबत घेऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांना डावलून मनमानी कारभार करत असल्याचा आरोप केला आहे. यावेळी शाखाप्रमुख शरद जाधव, गुरुदास गावकर, सत्यवान गावडे आणि बूथ प्रमुख संतोष गावडे यांनी आपले राजीनामे उपविभाग प्रमुख यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.

You cannot copy content of this page