५०० क्विंटल भात बियाणे, १०,२०० मे टन खत…

*_▪️खरीप हंगामासाठी झाले उपलब्ध; जिल्हा कृषि अधिकारी सुधीर चव्हाण यांची माहिती_*

सिंधुदुर्गनगरी ता २४ सिंधुदुर्ग जिल्ह्यसाठी खरीप हंगामसाठी ५००० क्विंटल भात बियाणे व १०२०० मे.टन ख़त उपलब्ध झाले.आहे.अशी माहिती जिल्हा कृषि अधिकारी सुधीर चव्हाण यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी चालू खरीप हंगामासाठी आवश्यक असलेले ७९७५ क्विंटल भात बियाणे आणि १७५७० मेट्रिक टन खताची मागणी संबंधित कंपनीकडे करण्यात आली आहे. यापैकी ५००० क्विंटल भात बियाणे व १०२०० मे.टन खत उपलब्ध झाले आहे.अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी सुधीर चव्हाण यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५५ हजार हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड केली जाते. त्यासाठी आवश्यक असलेले भात बियाणे व खत, खरीप हंगामासाठी उपलब्ध व्हावे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये. यासाठी विविध जातीची सुधारित व संकरित बियाणी आणि खताची मागणी संबंधित उत्पादित कंपनीकडे करण्यात आली आहे .यामध्ये ७ हजार ३५० क्विंटल सुधारित बियाणे व ६२५ क्विंटल संकरित भात बियाण्याचा समावेश आहे. त्यापैकी ५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. यामध्ये मसुरा, कर्जत, जया, सुवर्णा ,यासह विविध जातीची सुधारित व संकरित बियाण्याचा समावेश आहे. गत वर्षीच्या खरीप हंगामासाठी ४ हजार ६०० क्विंटल सुधारित व संकरित भात बियाणे उपलब्ध झाले होते. या सर्व बियाणांची शेतकऱ्यांकडून उचल झाली होती. याचा विचार करता या वर्षीच्या खरीप हंगामासाठी ७ हजार ९७५ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच मागणीनुसार गतवर्षी १७ हजार २०० मेट्रिक टन खताचा जिल्ह्यासाठी पुरवठा झाला होता .यावर्षी साठी १७ हजार ५७० मेट्रिक टन विविध प्रकारच्या खताची मागणी करण्यात आली त्यापैकी अतापर्यन्त १० हजार २०० मे.टन ख़त उपलब्ध झाले असून जिल्ह्यसाठी ख़त आणि भात बियान्यची तुटवडा भासणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. प्राप्त झालेले बियाणे तालुकास्तरावर वितरित झाले असून शेतकऱ्यानी आवश्य कतेनुसार खरेदी करावे. असे आवाहन जिल्हा परिषद कृषी अधिकारी सुधीर चव्हाण यांनी केले आहे.

You cannot copy content of this page