मुख्यमंत्र्यांवर होत असलेली टिका दुर्दैवी

चार दिवसात मुख्यमंत्री मदत जाहीर करतील;पालकमंत्री उदय सामंत

*💫सावंतवाडी दि.२२ प्रसन्न गोंदावळे-:* मुख्यमंत्र्यांवर होत असलेली टीका दुर्दैवी असून, चुकीची असल्याचे मत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. कोरोना सारख्या कठीण काळात मुख्यमंत्री करत असलेले काम पाहून विरोधक हतबल झाले असल्याची टीका पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई ची घोषणा मुख्यमंत्री येत्या ४ दिवसात घोषित करणार असल्याचे सांगत.फक्त टीका करत राहणाऱ्यांवर आम्ही लक्ष देत नसून, शिवसेना कायम कोकणवासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचे देखील स्पष्ट केले आहे.

You cannot copy content of this page