*मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न लवकरच सुटून कामाला सुरुवात होईल

*पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती*

*💫सावंतवाडी-:* सावंतवाडी तालुक्यात होणाऱ्या मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न लवकरच सुटणार असून, त्याच्या कामाला देखील लवकरच सुरुवात होणार असल्याची ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सावंतवाडी तालुक्यासाठी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनी पुढाकार घेऊन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मंजूर केले होते. अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दिली आहे.

You cannot copy content of this page