तीन दुकानदारांवर गुन्हे:एपीआय स्वाती यादव यांच्या पथकाची कारवाई
*💫सावंतवाडी दि.२२-:* कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने वेळेचे बंधन घातलेले असताना देखील, आज सावंतवाडी शहरात नियमांचे उल्लंघन करून सकाळी ११ नंतर देखील दुकाने सुरू ठेवणाऱ्या तीन दुकानांवर पोलिस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांनी कारवाई केली असून, शहरात मास्क न लावता फिरणाऱ्या सहा जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यातील एका युवकाने दंड भरण्यास नकार देत, कायदेशीर कारवाई करण्यास सांगितल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच वेळ संपल्यानंतर देखील सुरू असणाऱ्या तिन्ही दुकानांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई सावंतवाडी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय स्वाती यादव, पी.एस.आय यशवंते, पास्ते, मातोंडकर, होमगार्ड पाटील, नगरपालिका कर्मचारी परवीन शेख, रिझवान शेख यांनी केली आहे.
