⚡देवगड ता.२२-: श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा प्रवासी सेवेतून देवगड आगाराने सर्व सवलती सह १३२४९ किमी द्वारे, २३३६६ प्रवाश्याची वाहतूक करीत २३ गाड्यांच्या ४८५ प्रवासी फेऱ्यांद्वारे रु ६,५७,४८३/- एवढे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
देवगड कुणकेश्वर कणकवली रेल्वेस्टेशन या बरोबरच देवगड बोरिवली मार्गांवर एक जादा प्रवासी फेरी सोडण्यात येऊन भाविक भक्तांची विशेष सोय केली.
या यात्रा काळात सर्वाधिक उत्पन्न कणकवली रेल्वेस्टेशन देवगड कुणकेश्वर या प्रवासी फेरीतून चालक ए. के इंदप, वाहक व्ही. आर. सावंत, यांनी १२५६ प्रवासी वाहतूक करीत ९५६.०६ किमी मध्ये रु ५७८९२/एवढे उत्पन्न आणले.
नांदगाव तरेळे कुणकेश्वर या मार्गावर चालक एस. यु.बटवाले,वाहक जे. एस गोरुले,यांनी १२५७ प्रवासी द्वारे ९४१ किमी मध्ये रु ४९४७०/-एवढे द्वितीय क्रमांकाचे उत्पन्न मिळविले,
तुतीय क्रमांक चालक पी एस तोरसकर वाहक एस एस साटम यांनी ९८९ प्रवासी द्वारे ७८२.०२ की मी मधून रु ४०२३७/-एवढे उत्पन्न आणले.
चतुर्थ क्रमांक चालक एन एल साटम,वाहक एस पी परब यांनी १०४७ प्रवासी वाहतूक करीत ७२९ किमी मधून ३५४८१/- एवढे उत्पन्न आणले.
चालक एम डी जाधव,वाहक आर व्ही रावरे, यांनी ८७४ प्रवासी वाहतूक करून ७४३ किमी द्वारे रु ३५०४१ एवढे उत्पन्न आणले.
गतवर्षी पेक्षा २०७१ किमी मध्ये वाढ करून विनासवलत उत्पन्नात रु २०७५४/-एवढी वाढ झाली आहे.
सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक दीपक घोडे ,विभागीय वाहतूक अधिकारी विक्रमकुमार देशमुख,यंत्र अभियंता सुजित डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप,यांच्या नेतृत्वाखाली स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर,सहा वाह. निरीक्षक सचिन डोंगरे ,यांच्या समवेत यु.बी .मोहिते,के.व्ही.कांबळे ,पी.बी.राजम,आर .सि. मणचेकर,ए. पी,रावले,एस.के पवार ,बी. एस. जाधव, ए. व्ही कदम, ए., पी. पाटील महिला वाहतूक नियंत्रक पी.व्ही.बांदेकर, पी,पी.शिंदे,तसेच कार्यशाळा अधीक्षक, वाहन परीक्षक कार्यशाळा कर्मचारी चालक वाहक यांनी यात्रा सेवा सुरळीत व सुरक्षित पणे पार पाडली.
कुणकेश्वर यात्रा प्रवासी सेवेतून देवगड आगाराला रु.६,५७,४८३/-एवढे उत्पन्न…
