सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचे न्यायमूर्तींनी घेतले मनःपूर्वक दर्शन; विजिट बुकमध्ये व्यक्त केली भावना..
⚡देवगड ता.२२-:
देवगड तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराला आज न्यायमूर्ती संजय करोल (सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, नवी दिल्ली) यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांनी शंभू महादेवाची विधिवत पूजा करून कुणकेश्वर परिसराची पाहणी केली. समुद्रकिनारी वसलेले हे रमणीय व शांत मंदिर अत्यंत आध्यात्मिक व सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. येथे भेट दिल्यानंतर मन प्रसन्न झाले, असे मतही त्यांनी विजिट बुकमध्ये नमूद केले.
विजिट बुकमध्ये त्यांनी लिहिले की, “येथे अत्यंत मनःपूर्वक दर्शन घेतले. सर्व बंधू-भगिनींवर समसमान कृपा होवो. ट्रस्टचे व्यवस्थापन आणि येथील न्यायालयीन अधिकाऱ्यांनी उत्तम सहकार्य केले, याबद्दल विशेष आभार.” व्यक्त केले.
कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कुणकेश्वरची महती सांगणारी कथा ही कुणकेश्वराची पुस्तिका त्यांना भेट देण्यात आली.
यावेळी त्यांनी कुणकेश्वर मंदिरासह भैरव व नारायण मंदिराला भेट देत पाहणी केली.
या प्रसंगी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली, ॲड. शिल्पन गावकर, न्यायालयीन कर्मचारी तसेच देवस्थान ट्रस्टचे संजय वाळके, दीपक घाडी, सरपंच महेश ताम्हणकर, रामदास तेजम, कोकण इतिहास परिषद संशोधक रणजीत हिर्लेकर आदी उपस्थित होते.
