केळी बागायतींना मोठा फटका काजू, सुपारी, नारळ पिकाचेही नुकसान
*💫दोडामार्ग दि.२१-:* घोटगे गावात तौक्ते वादळामुळे केळी बागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. चार दिवसांपूर्वी धडकलेल्या तौक्ते वादळामुळे दोडामार्ग तालुक्यात लाखो रुपयांची हानी झाली आहे. याचा मोठा फटका हा केळी,काजू,नारळ,सुपारी बागायतदार यांना बसला आहे. घोटगे परमे घोटगेवाडी कुडासे या गावातील शेतकरी हे आपल्या वर्ष भराच्या उदरनिर्वाहासाठी आपल्या जमीनीत मोठ्या प्रमाणात केळी लागवड करतात.पण रविवारी झालेल्या वादळामुळे यांच्या केळीचे घड धरलेली जवळपास हजारो केळी मोडून जमिनीवर पडल्या आहेत,त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत, इतर वेळी मोठ्या बडाया मारणाऱ्या पुढाऱ्यांनी आता मात्र शेतकऱ्यांकडे फिरकून सुद्धा बघितले नाही. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी घोटगे येथील शेतकरी संदीप दळवी बाळा दळवी शंकर दळवी सतिश परब सहदेव दळवी भरत दळवी श्रीराम दळवी अरूण दळवी राजाराम दळवी संतोष गवस सुहास दळवी गुरु दळवी विजय दळवी सूर्याजी दळवी विदयानंद दळवी विकास दळवी अभिषेक दळवी महेश दळवी नरेश काळबेकर शंकर गवस सुरेश दळवी भास्कर दळवी प्रदीप दळवी राजन दळवी आनंद दळवी संदीप गवस सोमा गवस श्रीपत दळवी सहदेव दळवी समिर दळवी हरी दळवी यांनी केली आहे.
