चराठा व सावंतवाडी उपजिल्हा कोविड सेंटरमध्ये खाऊचे वाटप

सेनेचा उपक्रम:पालकमंत्री, खासदार, आमदार यांचा पुढाकार

*💫सावंतवाडी दि.२१-:* खासदार विनायक राऊत यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची विचारपूस करण्यात आली असून, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून व पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर, सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या सहकार्यातून तालुक्यातील चराठा आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हिड केअर सेंटर ला खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी या दोन्ही ठिकाणी जाऊन खाऊचे वाटप केले आहे. यावेळी शिवसेना सावंतवाडी तालुका महिला संघटक सौ. अपर्णा कोठावळे, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोठावळे, सुधीर धुमे, ऋतुजा मोरे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page