वेंगुर्ला बिडीओ वासुदेव नाईक यांना कोकण विभागस्तरावर उत्कृष्ट गटविकास अधिकारी पुरस्कार जाहीर

⚡वेंगुर्ला ता.१८-: माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत वेंगुर्ला पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव महादेव नाईक यांना कोकण विभागस्तरावर उत्कृष्ट गटविकास अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. यनिमित्त ग्रामपंचायत अधिकारी युनियन वेंगुर्ला मार्फत त्यांचा वेंगुर्ला पंचायत समिती कार्यालय येथे सत्कार करण्यात आला. यावेळी युनियनचे तालुका सरचिटणीस विवेक वजराटकर, कोषाध्यक्ष आनंद परुळेकर, सदस्य व्ही. जि. सावंत, विकास केळूसकर, मधुकर नवार, सायली सातोसे, सौरभ राऊळ, प्रवीण भोई, सोमा राऊळ, अमर गाडेकर आदी ग्रामसेवक – पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page