नौकेवर जात असताना पाण्यात पडून मच्छिमाराचा बुडून मृत्यू…

⚡देवगड ता.१८-:
खाडीच्या पाण्यात असलेल्या मच्छिमारी नौकेवर किनाऱ्यावरून पाण्यातून चालत जात असताना आनंद अनिल चिंदरकर (३५), रा. जामसंडे भटवाडी यांचा तोल जाऊन खाडीच्या पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला. ही घटना १८ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद चिंदरकर हे देवगड येथील उमेश बांदकर यांच्या मच्छिमारी पातीवर खलाशी म्हणून काम करत होते. बुधवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास ते देवगड जेटी येथे खाडीच्या पाण्यात असलेल्या पातीवर किनाऱ्यावरून पाण्यातून चालत जात असताना तोल जाऊन पाण्यात पडले व बुडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली.

याबाबत त्यांचे भाऊ अमित अनिल चिंदरकर यांनी देवगड पोलिस स्थानकात खबर दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. तपास स. पो. उपनिरीक्षक प्रविण सावंत करीत आहेत.

You cannot copy content of this page