आमदार दीपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती*
*💫सावंतवाडी दि.१९-:* तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पंचनामे सुरू असून, राहिलेल्या भागातील पंचनामे येत्या चार दिवसात पूर्ण होतील. अशी माहिती तालुक्याचे आमदार दिपक केसरकर यांनी झूम ऍप द्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. या वादळात तालुक्यातील ४१४ घरांचे नुकसान झाले तर ४ घरे पूर्णतः जमीनदोस्त झाली आहेत. अशी प्राथमिक माहिती दीपक केसरकर यांनी यावेळी दिली आहे. तालुक्यात सर्वात जास्त नुकसान झाडे पडल्यामुळे वीज वितरणाचे झाले आहे. वीज नसल्यामुळे लोंकांचे खूप हाल झाले आहेत. सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग येथील काही भागात लाईट नाही ती देखील उद्यापर्यंत येईल, तसे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे, असे केसरकर यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी नुकसान भरपाई तत्काळ मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. उद्या संध्याकाळ पर्यंत परिस्थिती पूर्ववत होईल,अशी आशाही केसरकर यांनी व्यक्त केली आहे.
