*तेरेखोल नदीपात्रात सापडला अज्ञाताचा मृतदेह

*💫सावंतवाडी दि.१८-:* किनळे ख्रिश्चन वाडी येथे तेरेखोल नदी पत्रात एक अज्ञात मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला असून, आज सायंकाळी हा प्रकार उघड झाला आहे. मृतदेह संपूर्ण कुजलेला असल्याने तो महिलेचा आहे की पुरुषाचा हे शोधणे पोलिसांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित मृतदेहाच्या कानात दोन रिंग मिळाले असून, त्यावरूनच हा मृतदेह कोणाचा आहे याचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी परिसरात कोणी व्यक्ती बेपत्ता असेल तर पोलिस स्टेशन वर संपर्क करावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page