*धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त करण्यात आले होते आयोजन;जिल्ह्यातील ८४ स्पर्धकांनी घेतला सहभाग*
*💫बांदा दि.१८-:* धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवप्रेमी सिंधुदुर्गच्या वतीने ऑनलाईन निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेचा निकाल १४ मे रोजी येणे अपेक्षित होते, परंतु स्पर्धकांचा अपेक्षेपेक्षा मिळालेला अधिक प्रतिसाद, वाढलेले लॉकडाऊन तसेच वादळसदृश्य परिस्थिती यामुळे निकाल देण्यास उशीर झाला, असे आयोजकांच्या वतीने कळवण्यात आले आहे. या स्पर्धेत पहिल्या गटात (पहिली ते चौथी) प्रथम क्रमांक- रेवण अनंत राऊळ(३ री) , द्वितीय क्रमांक- आयुष प्रदीप नाळे(२री), तृतीय क्रमांक- शमिका सचिन चिपकर ( ४थी) , उत्तेजनार्थ– प्रणाली गाेसावी (१ली) तर दुसऱ्या गटात (दाेन पाचवी ते आठवी) प्रथम क्रमांक- युक्ता हनुमंत तांडेल (८वी), द्वितीय क्रमांक- आकाश अनील नाईक (५वी), तृतीय क्रमांक- यतीन प्रमाेद घाडी (६वी) ,उत्तेजनार्थ- दुर्वा जयसिंग घाडी (५ वी) तर खुल्या गटात प्रथम क्रमांक- युवराज महिपती पचकर, द्वितीय क्रमांक- साईक्षा विठ्ठल केळजी, तृतीय क्रमांक- संपदा दिगंबर राणे, उत्तेजनार्थ- दयानंद आपा गावकर यांनी पटकावला आहे. या स्पर्धेचा निकाल लावताना निबंधाचा विषय, निबंधाची शब्द मर्यादा तसेच निबंधाची मांडणी व अक्षर याबाबींकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. काही निबंध खुपच माेठे व शब्द मर्यादेच्या बाहेर हाेते, अशा निबंधांचा वेगळा गट करून त्यांना वेगळे बक्षीस दिले जाईल, अशी माहिती शिवप्रेमी सिंधुदुर्गचे विवेक पंडित यांनी दिली आहे. लॉकडाऊन नंतर निबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. कुडाळ तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत चाललेला कोरोनाचा आलेख पाहता बक्षीस वितरण कार्यक्रम लॉकडाऊन नंतर घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा दिनांक स्पर्धकांना सूचित करण्यात येईल, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
