मालवण दि प्रतिनिधी तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसानी पोहोचलेल्या मालवण तालुक्याला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ संजना सावंत यांनी भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी सागरी अतिक्रमणग्रस्त देवबाग, आचरे भागाला भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी देवबाग मध्ये ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत ,पिण्याच्या पाण्याचे टँकर, ताडपत्री पुरवठा, तसेच वीज वितरण सुरळीत करण्याबाबत तत्काळ आदेश दिले तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसानी पोहोचलेल्या देवबाग, आचरे, या गावांना जिल्हा परिषद अध्यक्ष सौ संजना सावंत, यांनी भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत मालवण सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर उपस्थित होते आचरे येथे भेट दिल्यानंतर सौ सावंत यांनी आचरा जामडूल येथे ३ मीटर उंचीचा सरंक्षक बंधारा मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत चक्रीवादळ मुळे नुकसानी झालेल्याचे पंचनामे त्वरित करण्यात यावे असेही महसूल यंत्रणेला सूचित केले यावेळी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण , विस्तार अधिकारी व्ही. के. जाधव, गोसावी, ग्रामसेवक तसेच जिल्हापरिषद सदस्य जेरोन फर्नांडिस, पंचायत समिती सदस्या मधुरा चोपडेकर आदी उपस्थित होते.
*जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी मालवण तालुक्यातील नुकसानीची केली पाहणी
