तौक्ते चक्री वादळाने नुकसान झालेल्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी…

काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी

*💫सावंतवाडी दि.१८-:* सावंतवाडी तालुक्यात तौक्ते वादळासहीत झालेल्या पावसाने नुकसान झालेल्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी काँग्रेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. तौक्ते वादळाचा मोठा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला असुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली आहे. कोरोना काळातही आपल्या जीवाचे रान करून पंचनामे करणारे शासकीय अधिकारी व कर्मचारी व रात्रंदिवस एक करत सावंतवाडीतील विद्युत पुरवठा सुरळीत करणारे वीज कर्मचारी हे सगळे खरे योद्धे असून सांगेलकर यांनी त्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांच्या कामाचा शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page