नववर्ष स्वागताच्या गर्दीत साटेली-भेडशी बाजारपेठेत अपघात; पादचारी महिला जखमी…

⚡दोडामार्ग ता.३१-: नववर्ष स्वागतासाठी गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे वाढलेल्या गर्दीत आज दुपारी साटेली-भेडशी बाजारपेठेत अपघात झाला. कर्नाटक पासिंगच्या केए-०३ एमएक्स-४७८७ क्रमांकाच्या भरधाव कारने रस्ता ओलांडणाऱ्या पिकुळे येथील एका पादचारी महिलेला धडक दिली. या अपघातात महिला किरकोळ जखमी झाली.

अपघातानंतर स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी तातडीने मदत करत जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात हलवले. दरम्यान, अरुंद रस्ते व बाजारपेठेत भरधाव वाहनचालना केल्यामुळे अपघातांची भीती वाढली असून, अशा बेजबाबदार वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

You cannot copy content of this page