आंतर महाविद्यालयीन हँडबॉल स्पर्धेत श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची दमदार कामगिरी…

⚡सावंतवाडी ता.३१-:
मुंबई येथे पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन हँडबॉल स्पर्धेत श्री पंचम खेमराज महाविद्यालयाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला. संपूर्ण स्पर्धेत संघाने दाखवलेली एकजूट, शिस्त आणि तांत्रिक कौशल्य उपस्थितांची मने जिंकणारी ठरली.
या स्पर्धेत महाविद्यालयातील सुजल सुभाष गवस या खेळाडूने आक्रमक व अचूक खेळ करत उत्कृष्ट शूटर पारितोषिक मिळवून वैयक्तिक कामगिरीची मोहोर उमटवली. त्याचबरोबर सुजल गवस यांची मुंबई विद्यापीठाच्या हँडबॉल संघातून पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हँडबॉल स्पर्धेसाठी निवड झाल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजे खेमसावंत भोसले, कार्याध्यक्षा राणी शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखम सावंत भोसले, युवराज्ञी श्रद्धा भोसले, संस्थेचे नियामक संचालक डी. टी. देसाई, अॅड. शामराव सावंत, जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत तसेच प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशामागे महाविद्यालयाचे क्रीडा संचालक चंद्रकांत नाईक यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन, मेहनत आणि प्रेरणादायी नेतृत्वाचा मोलाचा वाटा असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

You cannot copy content of this page