रामगडच्या प्रगत विद्यामंदिरच्या चार विज्ञान प्रतिकृतींची राज्यस्तरावर निवड…

⚡मालवण ता.३१-:
राज्य विज्ञान संस्था रवीनगर नागपूर, शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व मिलाग्रीज हायस्कूल सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मिलाग्रीज हायस्कूल सावंतवाडी येथे आयोजित ५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मालवण तालुक्यातील रामगड येथील प्रगत विद्यामंदिरच्या चार प्रतिकृतींची राज्यस्तरावर निवड झाल्याने या प्रशालेने घवघवीत यश संपादन केले आहे. एकाच शाळेच्या चार प्रतिकृती राज्यस्तरावर निवड होणारी प्रगत विद्यामंदिर ही जिल्ह्यातील एकमेव शाळा ठरली आहे.

या विज्ञान प्रदर्शनात प्रगत विद्यामंदिर, रामगड यां शाळेने मिळविलेले यश पुढीलप्रमाणे प्राथमिक गट- दिव्यांग विद्यार्थी प्रतिकृती:- प्रथम क्रमांक (समृध्दी गुरूनाथ चव्हाण, प्रांजली पुणाजी घाडीगांवकर), प्राथमिक विद्यार्थी गट प्रतिकृती- द्वितीय क्रमांक – मानवी विष्णू घाडीगांवकर. माध्यमिक गट- दिव्यांग विद्यार्थी प्रतिकृती- प्रथम क्रमांक – ओंमकार पंकज राणे, माध्यमिक विद्यार्थी प्रतिकृती- प्रथम क्रमांक – ओमतेज उल्हास तारी, अभिषेक अनिल परब. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झालेली आहे.

या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष वा.स.प्रभूदेसाई, उपाध्यक्ष सु.रा.तळवडेकर, सचिव वि.म.मटकर, सहसचिव डी.डी.वाघ, खजिनदार विजय कुवळेकर, संस्था संचालक अभय प्रभुदेसाई, सुभाष धुरी, ज्ञानदेव जाधव, तातोबा घाडीगांवकर, मोहन घाडीगांवकर, वसंत हाटले, घनश्याम चव्हाण, गोपीनाथ लाड, नरहरी परूळेकर, नरेंद्र हाटले, मुख्याध्यापिका सौ. डि.टी.पेडणेकर, प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page