⚡सावंतवाडी ता.३१-:
सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या वतीने सामाजिक कार्यात सक्रिय असलेले अमोल चव्हाण यांची सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत नियुक्तीपत्र समितीच्या राज्याध्यक्ष डॉ. सौ. सुनीताबाई मोडक यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे.
सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या माध्यमातून समाजातील दुर्बल, वंचित, पीडित व गरजू घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून, समाजहिताच्या कार्यासाठी अमोल चव्हाण यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली
आहे.
समाजातील सामाजिक, सांस्कृतिक व नैतिक मूल्यांची जोपासना करत गरजू नागरिकांना मदतीचा हात देणे, तसेच सेवाभावी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवाभावी संस्था प्रबोधन समितीचे कार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या नियुक्तीबद्दल अमोल यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
