हत्ती प्रश्नावर एकत्र येण्याचे आवाहन-: गणेशप्रसाद गवस..

⚡दोडामार्ग ता.३१-: तालुक्यातील हत्ती प्रश्न हा आजचा नसून २००२ पासून सुरू असल्याचे शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी सांगितले. विरोधकांनी टीका करावी, मात्र केवळ आम्हालाच दोषी धरू नये, असे ते म्हणाले.
हत्तीमुक्त दोडामार्गसाठी आमचे शंभर टक्के प्रयत्न सुरू असून या जबाबदारीतून आम्ही कधीही पळ काढणार नाही, असे गवस यांनी स्पष्ट केले. ओंकार हत्ती प्रकरणात न्यायालयाने हत्तीला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे आदेश दिले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दोडामार्ग हा हत्तींचा अधिवास असल्याचा दावा मान्य नसून, हा प्रश्न कायमचा तालुक्यावर लादला जाऊ नये, असे गवस म्हणाले. शेतकरी व ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी पक्षीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

You cannot copy content of this page