वेंगुर्ला पोलीस ठाणे च्या वतीने आज मध्यरात्री ऑलआउट ऑपरेशन मोहीम…

⚡वेंगुर्ला ता.३१-: 31st व न्यू इयर 2026 च्या अनुषंगाने वेंगुर्ला पोलीस प्रशासन सलग दुसऱ्या दिवशी अलर्ट मोडवर असून आज बुधवारी रात्री 8 वाजता ते मध्यरात्री 3 वाजता या वेळेत संपूर्ण तालुक्यात
ऑलआउट ऑपरेशन मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार वेंगुर्ला पोलीस ठाणे च्या वतीने इयर एंडिंग व न्यू इयर 2026 च्या अनुषंगाने आज बुधवारी सकाळी 6 वा. पासून 12 तास अखंड ऑपरेशन विजय ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तालुक्यातील सर्व कोस्टल एरियात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या मोहिमेत पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पीएसआय शेखर दाभोलकर, योगेश राठोड, तुकाराम जाधव, पोलीस हवालदार प्रथमेश पालकर, वाहतूक पोलीस मनोज परुळेकर, योगेश राऊळ, जयेश सरमळकर, स्वप्नील तांबे, योगेश सराफदार, दीपाली मठकर, होमगार्ड तुषार मांजरेकर, जगन्नाथ शेटकर आदी व अन्य पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
थर्टी फस्टच्या अनुषंगाने वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज रात्री – मध्यरात्री ऑलआउट ऑपरेशन मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार कोस्टल एरियात, बाजारपेठ, ग्रामीण भागात गस्त व पेट्रोलिंग सुरु राहणार आहे. नागरिकांनी थर्टी फस्ट शांततेत साजरा करावा, मद्यप्राशन करून रात्री वाहने चालवू नयेत, असे पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page