देवगड जामसंडे नगरपंचायत विषय समितीपदाची निवड बिनविरोध..
⚡देवगड ता.३०-:
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विशेष सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपाने पुन्हा वर्चस्व राखले असून विषय समिती सभापती निवडणुकीमध्ये बांधकाम सभापतीपदी रोहन खेडेकर, पाणी पुरवठा सभापतीपदी सौ.तन्वी चांदोस्कर, स्वच्छता आरोग्य सभापतीपदी निवृत्ती उर्फ बुवा तारी तर महिला बालकल्याण उपसभापतीपदी मनिषा जामसंडेकर यांची बिनविरोध निवड झाली.
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विशेष सभापतीपदाची निवडणुक प्रक्रिया मंगळवारी निवडणुक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सौ.गौरी पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. बांधकाम सभापतीपदी रोहन खेडेकर, पाणी पुरवठा सभापतीपदी सौ.तन्वी चांदोस्कर, स्वच्छता आरोग्य सभापतीपदी निवृत्ती उर्फ बुवा तारी तर महिला बालकल्याण उपसभापतीपदी मनिषा जामसंडेकर यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले.मात्र विरोधी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही निवडणुक प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
या निवडणुकीत रोहन खेडेकर, बुवा तारी, सौ.तन्वी चांदोस्कर व मनिषा जामसंडेकर या चौघांचीही बिनविरोध निवड जाहीर झाल्यानंतर त्यांचे भाजपा पदाधिकारी , कार्यकर्ते व नगरसेवक यांच्यावतीने पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले.यावेळी भाजपा देवगड मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, उपनगराध्यक्ष सौ.मिताली सावंत, भाजपा गटनेते शरद ठुकरूल, महिला तालुकाध्यक्षा सौ.उष:कला केळूस्कर,कोषाध्यक्ष राजेंद्र वालकर, बाळा खडपे, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, सौ.प्रियांका साळसकर, शहरअध्यक्ष वैभव करंगुटकर, युवा मोर्चा शहरअध्यक्ष दयानंद पाटील, उल्हास मणचेकर, ज्ञानेश्वर खवळे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सर्फराज शेख, सौ.मनस्वी घारे, प्राजक्ता घाडी, तन्वी शिंदे, नगरसेवक संतोष तारी, प्रणाली माने, स्वरा कावले, रूचाली पाटकर, आद्या गुमास्ते, चंद्रकांत कावले, मृणाली भडसाळे, ललित चांदोस्कर, व्ही.सी.खडपकर, गुरूनाथ कांबळी, नरेश डामरी,विजय कदम, विनोद तेली, संदेश जामसंडेकर, सचिन मालंडकर आदी उपस्थित होते.
