⚡सावंतवाडी ता.२५-: सातार्डे मध्यवर्ती संघ, मुंबई संचलित, महात्मा गांधी विद्यामंदिर सातार्डा हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण व विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम मंगळवार दिनांक ३० डिसेंबर रोजी २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहेत.
सदरील कार्यक्रम संदीप परब( संस्थापक जीवन आनंद संस्था ,कुडाळ)यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून दत्ता कवठणकर (उद्योजक कवठणी) तर प्रमुख अतिथी म्हणून शिवानंद राऊळ( उद्योजक सातार्डा) ज्ञानेश्वर मांजरेकर (माजी मुख्याध्यापक सातार्डा हायस्कूल),रवींद्र धाकोरकर,नामदेव साटेलकर (माजी शिक्षक सातार्डा हायस्कूल) तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून,सदरील कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महात्मा गांधी विद्यामंदिर सातार्डा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
