“गद्दारांना क्षमा नाही”…

सालईवाडा प्रभाग क्र. ८ मधील ‘तो’
बॅनर ठरला लक्षवेधी: शहरात देखील जोरदार चर्चा..

⚡सावंतवाडी ता.२५ प्रसन्न गोंदावळे -: सावंतवाडी शहरातील सालईवाडा प्रभाग क्रमांक ८ येथे लावण्यात आलेला “गद्दारांना क्षमा नाही” असा मजकूर असलेला बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा बॅनर नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने लावला, याबाबत नागरिकांमध्ये तर्कवितर्क सुरू आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीतील जय–पराजयाच्या पार्श्वभूमीवरच हा बॅनर झळकल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली होती. निवडणुकीच्या काळात झालेले आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय घडामोडींनंतर हा बॅनर लावण्यात आला का, अशी चर्चा शहरात रंगली आहे.मात्र हा बॅनर काही काळासाठीच लावण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत तो बॅनर हटवला.

You cannot copy content of this page