⚡सावंतवाडी ता.२५-: भालावल ग्रामपंचायत वतीने गावातील शाळा,ग्रामस्थांसाठी विविध सामाजिक उपक्रम ,स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाला,स्पर्धांना भालावल गावातून उत्तम असा प्रतिसाद लाभला.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा तसेच गावातील उपक्रमात सहभागी ग्रामस्थांचा यावेळी विशेष सत्कार करून त्यांना रोख रक्कम,सन्मानचिन्ह , गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आलं.
या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून सरपंच समीर परब,उपसरपंच अर्जुन परब, बी आर सी गटप्रमुख समिल नाईक,महसूल अधिकारी विजय कविटकर,ग्रामपंचायत अधिकारी तृप्ती राणे,आरोग्य सेवक आत्माराम गवस,आरोग्य सेविका तन्वी पाटील,मुख्याध्यापक नम्रता कोठावळे ,मदन मुरकर,तंटामुक्ती अध्यक्ष रमेश परब उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांच स्वागत फुल झाड, गुलाबपुष्प देऊन करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी यांनी ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात आलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत स्पर्धांची माहिती देत स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या तसेच स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमात विविध उपक्रमांतर्गत स्पर्धा आयोजित केल्या होत्या यात,पर्यावरण पूरक गणेश सजावट स्पर्धा, लेक वाचवा, लेक वाढवा,प्लास्टिक बंदी करिता प्लास्टिक द्या,झाडे घ्या हा उपक्रम तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संत गाडगेबाबा ग्राम स्वछता अभियान अंतर्गत विविध निबंध स्पर्धा, स्वच्छता अभियान, मुलांसाठी हिमोग्लोबीन तपासणी शिबिर,आरोग्य शिबिर ,सुदृढ बालक,कन्यारत्न कुटुंब सन्मान ,प्लास्टिक बँक,गांडुळ खत निर्मिती, कचऱ्याच व्यवस्थापन,सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, पाण्याचं नियोजन,शोषखड्डा असे नाविन्यपूर्ण वेगवेगळे उपक्रम व स्पर्धा राबविण्यात आल्या.यासाठी गावातील ग्रामस्थांनी बरीच मेहनत घेत ग्रामपंचायतीला सहकार्य केले.
यावेळी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
तसेच ग्रामपंचायतने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सक्रीय सहभाग घेतला असून, याबाबत उपस्थित बी. आर. सी.गटप्रमुख समिल नाईक तसेच महसूल अधिकारी विजय कविटकर यांनी अभियानाबाबत उपस्थितांना योग्य असे मार्गदर्शन करून सर्व ग्रामस्थांनी या अभियानास सहभाग घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्रामपंचायत अधिकारी तृप्ती राणे यांनी केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमित गुळेकर,वृषाली परब, गंधा गावडे,शिक्षक विठ्ठल कुंभार, रुपेश गुंजार, अपूर्वा सावंत आशा सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकृष्ण परब,लक्ष्मण कोकरे, डाटा ऑपरेटर प्रेमा परब,ग्रामस्थ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
