मालवणात बांगलादेशचा झेंडा पायदळी तुडवत जाळला…

बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराचा हिंदू धर्मियांकडून निषेध..

⚡मालवण ता.२४-:
बांगलादेश मुर्दाबाद… भारत माता की जय… वंदे मातरम… घराघरातून करा पुकार… हिंदुत्वाचा जयजयकार… आर्य सनातन हिंदू धर्माचा विजय असो.. अशा घोषणा देतानाच बांगलादेशचा झेंडा पायदळी तुडवत तो जाळून आज मालवणातील हिंदू धर्मियांनी बांगलादेशमध्ये हिंदू धर्मियांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात तीव्र निदर्शन केले.

बांगलादेश मध्ये हिंदू धर्मीय तरुणाला जिवंत जाळल्याप्रकरणी आणि तेथे हिंदूंवर होत असलेल्या अत्याचार विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे मालवणात भरड नाका येथे हिंदू बांधव भगिनींनी एकत्र येत बांगलादेश विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. यावेळी बांगलादेशचां झेंडाही जाळण्यात आला. यावेळी विश्व हिंदू परिषद तालुका अध्यक्ष भाऊ सामंत, प्रखंड सहमंत्री हरेश पडते, बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक श्रीराज बादेकर, प्रखंड संयोजक गणेश चव्हाण, स्वप्निल गाडी पार्थ डिचवलकर, सुरेश मानवर, शिवशंभू विचार मंचचे जिल्हा संयोजक भूषण साटम, नगरसेवक मंदार केणी, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, सनातन संस्थेचे राजन सकपाळ, दीनानाथ गावडे, महेंद्र पाताडे, अरविंद मयेकर, पंकज नेरकर, श्रीराम परब, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे श्रीधर काळे, स्वराज्य संघटनेच्या सौ. शिल्पा खोत, माजी नगरसेविका पूजा सरकारे, राणी कुडाळकर, तनु भगत, अंजना सामंत, महिमा मयेकर, अमिता न्हिवेकर, राजेश वळंजू, मंदार सरजोशी, अजित आचरेकर, अशोक चव्हाण, बाबी चव्हाण, राजू आंबेरकर, हरी चव्हाण, मिलिंद झाड, नंदू गवंडी, निलेश गवंडी, शरद मोरे, ओम अटक, अमन गोडवले, आनंद आचरेकर आदी व इतर उपस्थित होते.

बांगलादेशमध्ये हिंदू धर्मीय सुरक्षित नसून त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, याविरोधात भारतातील हिंदूंनी एकवटून आवाज उठविला पाहिजे, हिंदूंनी आता जागृत झाले पाहिजे, असे यावेळी भाऊ सामंत यांनी सांगितले.

यावेळी भूषण साटम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री. साटम म्हणाले, धर्मांध शक्तिकडून आज हिंदू धर्मियांवर अत्याचार होत आहेत. अत्याचारच्या घटना आजच घडत नसून ७ व्या शतकापासून धर्मांध शक्तींनी हिंदू धर्मियांवर आक्रमणे होत आहेत. बांगलादेशला वेगळा देश बनविण्यासाठी भारताच्याच सैनिकांनी, हिंदू बांधवांनी आपले रक्त सांडले होते. मात्र याच बांगलादेशात आज अल्पसंख्यांक असणाऱ्या हिंदू धर्मियांवर अत्याचार होत आहेत हि हिंदू धार्मियांसाठी खेदाची आणि आत्मसन्मानाला आव्हान देणारी गोष्ट आहे. बांगलादेश मधील दीप चंद्रदास या हिंदू तरुणाची अमानुषपणे हत्या करण्यात आली. हे अत्याचार हिंदू अखंडत्वावर आणि सार्वभौमत्वावार घाला आहे. या जिहादी धर्मांध शक्तीकडून संपूर्ण भारतात आक्रमणाचा डाव आहे. हा डाव आपण आताच ओळखला पाहिजे, संपूर्ण भारतात अशाप्रकारची निदर्शने झाली पाहिजेत, बांगलादेशातील घटनेची भारत सरकारने दखल घेऊन यामध्ये राजकीय व प्रसंगी लष्करी हस्तक्षेप करावा, असेही भूषण साटम म्हणाले.

You cannot copy content of this page