जानवली येथे लॉटरी विक्रेत्‍यांची रविवारी बैठक…

⚡कणकवली ता.२४-: महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेची विक्रेत्यांच्या न्याय हक्कांसाठीची विशेष बैठक येत्या रविवारी २८ डिसेंबरला सकाळी ११ वाजता महामार्गालगतच्या हॉटेल रिलॅक्‍स जानवली येथे होणार आहे. विक्रेत्यांचे मुंबईतील नेते विलास सातार्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असल्‍याची माहिती विक्रेता संघटनेचे सिंधुदूर्ग जिल्हाप्रमुख संजय सावंत यांनी दिली. महाराष्ट्रातील लॉटरी विक्रेत्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाॅटरी विक्रेत्यांचा अस्तित्वाची लढाई आहे. विक्रेत्यांना रोजगार देणाऱ्या लाॅटरी च्या संरक्षणासाठी संघटना सज्ज आहे, असे स्पष्ट करुन जिल्हाप्रमुख सावंत यांनी या बैठकीला जिल्हास्तरीय विक्रेत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page