आरोंदा हायस्कूल येथे २९ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय समूहगीत स्पर्धा…

⚡सावंतवाडी ता.२४-: आरोंदा येथे डॉ.पी.वाय . नाईक पुरस्कृत पत्नी स्व.पुष्पा प्रभाकर नाईक स्मृती प्रित्यर्थ आरोंदा हायस्कूल येथे जिल्हास्तरीय समूहगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा दोन गटात होणार आहे.

(गट क्रमांक एक – पाचवी ते सातवी )प्रथम क्रमांक ५०००/_ रुपये प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह द्वितीय क्रमांक ३०००/- रुपये प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह तृतीय क्रमांक २०००/- रुपये प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह तसेच उत्तेजनार्थ १०००/- रुपये प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह.
( गट क्रमांक दोन – आठवी ते दहावी) प्रथम क्रमांक ५०००/- रुपये प्रशस्तीपत्र स्मृतीचिन्ह ,द्वितीय क्रमांक ३०००/- रुपये प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह तृतीय क्रमांक २०००/- रुपये प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह तर उत्तेजनार्थ १०००/- रुपये प्रशस्तीपत्र स्मृतीचिन्ह.
या स्पर्धेसाठी प्रशालेतील प्रत्येक गटातून दहा विद्यार्थी सहभागी होऊ शकतात .गीत देशभक्तीपर असावे .स्पर्धेची वेळ सात मिनिटे असून स्पर्धकांनी वाद्य व वादक स्वतः आणावेत कोणत्याही इलेक्ट्रिक साधनांचा वापर करू नये आयोजकांच्या वतीने स्पर्धकांची भोजनाची व्यवस्था करण्यात येईल .स्पर्धक संघाने वेळेपूर्वी अर्धा तास आपली उपस्थिती नोंदवावी .सदरील स्पर्धा सोमवार दिनांक २९ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता सुरू होईल. स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण त्याच दिवशी दुपारी चार वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असून स्पर्धकांनी आपली नावे २५ डिसेंबर पर्यंत स्वतः येऊन किंवा व्हॉट्सअँप वर द्यावित.
स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी संपर्क कलाशिक्षक चंदन गोसावी – स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी संपर्क कलाशिक्षक चंदन गोसावी – ८३९०१४१४५५ व मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे – ९१५८४६३२९६ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन आरोंदा हायस्कूल संस्थाचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page