युवकांनी पुढाकार घेत रेस्क्यू करून दिले मुक्या प्राण्यांला जीवदान..
⚡सावंतवाडी ता.२४-: वरची मळेवाड येथे रात्रीच्या सुमारास दिलीप माळकर यांच्या घरा शेजारील शौचालयाच्या टाकीत गाय पडली.मात्र सकाळी सदरील घटना घरातील व्यक्तींच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली.
मात्र सदरील टाकीत गाय की गवा रेडा पडल्याचे काळात नव्हत.मात्र सगळीकडे गवा रेडा टाकीत पडल्याची वार्ता पसरली.त्यामुळे घटनास्थळी सर्वांनी धाव घेतली.काहींच्या. यावेळी तेथे बघ्यांची गर्दी मात्र वाढू लागली.याबाबत तत्काळ वनविभागाला कळविण्यात आले.वनविभागाचे कर्मचारी चंद्रकात पडते घटनास्थळी दाखल होत.त्यांनी वरिष्ठांशी याबाबत माहिती दिली.मात्र तोपर्यंत तिथे लोकांची बरीच गर्दी झाली.
प्रथम दर्शनी काही लोकांचे मत हे गाय असल्याचे तर काहींचे मत हे गवा रेडा असल्याचे होते.
मात्र युवकांनी पुढाकार घेत मुक्या प्राण्यांला जीवदान देण्याचं ठरविलं आणि ज्ञानेश्वर तुळसकर बबन नाईक,प्रवीण मुळीक ,आतिश राऊत ,दिलीप माळकर, चंद्रकांत मुळीक, अभि मुळीक आणि ग्रामस्थ यांनी तातडीने या प्राण्याला रेस्क्यू करण्याचे काम हाती घेतले.मोठ्या अथक प्रयत्नात टाकीत पडलेल्या गाईला जीवदान दिले.मात्र सदरील गवा रेडा नसून गाय (गोमाता ) असल्याचे लक्षात आले.
गाय रात्रभर त्या टाकीत पडल्याने शेवटची घटका मोजत होती.पण तत्काळ युवकांनी केलेल्या रेस्क्यू मुळे एका मुक्या प्राण्याचा जीव वाचल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
