सावंतवाडी : माडखोल-धवडकी शाळेचे माजी उपशिक्षक व श्री कलेश्वर विद्यामंदिर, वेत्ये शाळेचे विद्यमान शिक्षक तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक अरविंद सरनोबत यांना राज्यस्तरीय ‘आयडॉल शिक्षक’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून यावर्षी प्रथमच प्राथमिक शिक्षकांचे मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी संपूर्ण आयुष्य शाळा व विद्यार्थी विकासासाठी समर्पितपणे कार्य करणाऱ्या उपक्रमशील व गुणवंत शिक्षकांची राज्यस्तरावर ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये अरविंद सरनोबत यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून राज्यस्तरावर निवड झाली आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांच्यावतीने छत्रपती संभाजीनगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. या पुरस्काराबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुंडलिक देऊलकर, उपाध्यक्ष परशुराम पाटकर, मुख्याध्यापक शीतल गावित, रेश्मा गावडे, दीक्षा आडारकर आदींनी अरविंद सरनोबत यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
श्री कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेचे शिक्षक अरविंद सरनोबत यांना राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक पुरस्कार प्रदान…
