उद्योजक आनंद गवस यांचा गांधी चौक मित्र मंडळाकडून सन्मान…

⚡बांदा ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्हा सॉ-मिल संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी येथील श्री स्वामी समर्थ सॉ-मिलचे मालक उद्योजक आनंद गवस यांची निवड झाल्याबद्दल बांदा येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव गांधी चौक मित्र मंडळ यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष अनिल नाटेकर, खजिनदार ओंकार नाडकर्णी यांच्यासह मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते रामचंद्र उर्फ भाऊ वाळके, श्रीप्रसाद वाळके, संदेश पावसकर आदी उपस्थित होते.
यावेळी आनंद गवस यांच्या सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत मंडळाच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या सन्मानामुळे गवस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सॉ-मिल संघटनेचे कार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

You cannot copy content of this page