सावंतवाडी ता.२३-:
सावंतवाडीतील सालईवाडा परिसरात चक्का गव्या रेड्यांच्या कळपामुळे आज सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. ही घटना सायंकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
रस्त्यावर अचानक गव्यांचा कळप आल्याने काही काळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, ही घटना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. परिसरात यापूर्वीही अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ व कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
