भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जयंतीनिमित्त बांद्यात रंगभरण व चित्रकला स्पर्धा…

⚡बांदा ता.२३-: भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, बांदा शहर यांच्या वतीने बुधवार दिनांक २५ डिसेंबर रोजी बांदा येथील अटल बिहारी वाजपेयी उद्यानात शहर मर्यादित रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून, विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कल्पकता आणि कला गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा पुढील गटांमध्ये घेण्यात येणार आहे.
• बालवाडी ते तिसरी – रंगभरण स्पर्धा
• चौथी ते आठवी – रंगभरण स्पर्धा
• नववी ते खुला गट – चित्रकला स्पर्धा
या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, मुलांनी तसेच कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टी, बांदा शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन मिळेल तसेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना उजाळा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page